सकाळ वृत्तसेवा बेळगाव ता, 13. विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्यक्षेत्र पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल अनगोळ, आयोजित 37 व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धत दक्षिण मध्यक्षेत्र सघानी विजेतेपद पटकाविले.
तर ,वेस्ट युपी यानी विजेतेपद पटकाविले 14 वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात सामन्यात दक्षिण मध्यक्षेत्रने पश्चिम उत्तर प्रदेश क्षेत्राचा 1-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या मुक्ता हिने एकमेव गोल केला 17 वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात दक्षिण मध्य क्षेत्रने उत्तर क्षेत्राचा 1-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या समीक्षा खन्नुरकरने एकमेव गोल केला. 19 वर्षाखालील गटात पश्चिम उत्तर प्रदेशने उत्तर क्षेत्राचा 2-0 असा पराभव करीत
विजेतेपद पटकाविले. विजयी संघाच्या भूमिकाने गोल नोंदविला, स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या महापौर प्रीती कामकर, बेळगावचे पोलीस उपआयुक्त नारायण बरमानी, क्रीडा भरतीची राज्यसचिव अशोक शिंत्रे पूर्वोत्तरचे निरीक्षक सुबोध बोराह, राजस्थानचे कमलेश शर्मा विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, राघवेंद्र कागवाड ,राज्य क्रीडा प्रमुख देवेंद्रजी,विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ एस व्ही कुलकर्णी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी ऋतुजा जाधव,या मान्यवरांच्या हस्ते
चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील,अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार, जयसिंग धनाजी, बापू देसाई,हर्ष रेडेकर, उमेश मजुकर, बसवत पाटील, सुनील तगारे मानस नायकसह विविध क्षेत्रातील क्रीडाशिक्षक व आयोजन कमिटीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर तर धनश्री पाटील, सविता पाटणकर यांनी आभार मानले शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

