बेळगाव : धामणे रोड, वडगाव येथील रहिवासी कै. लक्ष्मीबाई नारायण देसुरकर (वय 77) यांचे सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवार रात्री 9 वाजता शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कै. लक्ष्मीबाई देसुरकर या श्री विश्वकर्मा सेवा संघ, बेळगावचे अध्यक्ष मा. श्री. रमेश देसुरकर यांच्या काकू होत.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने देसुरकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व देसुरकर परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
श्री विश्वकर्मा सेवा संघ, बेळगाव यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.









