Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

खानापूरमध्ये थरार! अस्वलाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जीव धोक्यात

खानापूरमध्ये थरार! अस्वलाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जीव धोक्यात

जनावरे चारायला जंगलात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील जंगलात ही घटना घडली.झाडावर चढून शेतकऱ्याने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
हुळंद गावातील शेतकरी महेश गावडे (25) हा रोजच्या  प्रमाणे जंगलात जनावरांना चरण्यास घेऊन गेला होता. जंगलात जनावरे चरत असताना अचानक महेश समोर अस्वल आले. प्रसंगावधान राखून महेशने बाजूच्या झाडावर चढून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण अस्वल देखील त्याच्या बरोबर झाडावर चढले आणि त्याचा चावा घेतला. अस्वलाने पायावर हल्ला केल्याने पायाला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. यावेळी जंगलातून जाणाऱ्या अन्य शेताकऱ्यांनी महेश जखमी अवस्थेत पडल्याचे पाहिले आणि वन खात्याला कळवले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने महेश याची अवस्था गंभीर आहे. त्याच्यावर बेळगाव मधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगाव काँग्रेसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शहराध्यक्ष निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी*कारगिल विजय दिन: बेळगावातील MARATHA LIRC मध्ये शहीदांना मानवंदना**सेल्फी घेताना घडली शोकांतिका; तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह सापडला**मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात**हिरेबागेवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ₹1.22 लाख जप्त**कारगिल विजय दिन: बेळगावात आमदार आसिफ सेठ यांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली**कारगिल विजय दिन: बेळगावात माजी सैनिकांची भव्य तिरंगा बाईक रॅली*कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहन