Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कर्नाटक शिक्षक भरतीत मराठी माध्यमावर अन्याय? सीमाभागातून आवाज बुलंद*

 कर्नाटक शासनाने प्रसिद्ध केलेल्या GPSTR, PSTR आणि HSTR शिक्षक भरतीच्या मसुदा (Cadre & Recruitment Draft Rules) नियमांवर सीमाभागातील मराठी माध्यमाच्या शिक्षक उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मसुद्यातील काही तरतुदींमुळे हजारो D.Ed. आणि B.Ed. पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभागच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात मराठी माध्यमातील उमेदवारांसाठी स्वतंत्र मराठी भाषा प्राविण्य चाचणीचा अभाव, भरती परीक्षेसाठी मराठी माध्यमाची सुविधा नसणे, पदवीसंदर्भातील जाचक अटी, D.Ed. आणि B.Ed. सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केवळ 2 टक्के वेटेज, तसेच विज्ञान शाखेतील अनेक पात्र उमेदवारांना अपात्र ठरविणाऱ्या अटींबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

याशिवाय अनेक वर्षांनंतर शिक्षक भरती होत असताना उमेदवारांना वयोमर्यादेत आवश्यक सवलत देण्यात आलेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

समितीच्या मते, हा केवळ भरती प्रक्रियेचा मुद्दा नसून सीमाभागातील मराठी भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षक उमेदवारांना समान संधी मिळण्यासाठी मसुद्यात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने कर्नाटक शासनाकडे पत्र आणि ई-मेलद्वारे अधिकृत आक्षेप नोंदवले असून, मराठी माध्यमातील सर्व D.Ed. आणि B.Ed. उमेदवारांनीही शासनाकडे लेखी हरकती दाखल करून आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*NRJ राज्य ज्युनियर जलतरण स्पर्धेत बेळगावचा जलवा; स्विमर्स क्लबची 15 पदकांची कमाई**बेळगावात दलित संघर्ष समितीचे आंदोलन; सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप**बेळगावात भाजपचे चाबूक आंदोलन; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर**बेळगावात सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात आंदोलन; 'नीट' चौकशीची मागणी**कर्नाटक शिक्षक भरतीत मराठी माध्यमावर अन्याय? सीमाभागातून आवाज बुलंद**बेळगावात अग्निवीर भरती रॅली; 7 ऑगस्टपासून अर्जदारांसाठी मोठी संधी**बेळगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी बी. जे. गंगाई; उपमहापौरांकडून सत्कार*माजी आमदार राजेश पाटील यांनी केला NEET टॉपर सार्थकचा गौरवसीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौराबेळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनावर सवाल