LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*हिरेबागेवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ₹1.22 लाख जप्त*

 शहरातील हिरेबागेवाडी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून 10 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ₹1,22,016 इतकी रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2026 रोजी शगणमट्टी परिसरातील लीघ फार्मजवळ काही जण सार्वजनिक ठिकाणी पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाय. व त्यांच्या पथकाने छापा टाकला.

कारवाईदरम्यान दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ₹1,22,016 रोख रक्कम, पत्त्यांचा संच आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. दरम्यान, छाप्यावेळी एक संशयित घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 151/2026 दाखल करण्यात आला असून कर्नाटक पोलीस कायदा 1963 मधील कलम 87 अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छापा टाकणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*