LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*बेळगावात भाजपचे चाबूक आंदोलन; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर*

 राज्य सरकारच्या कृषी धोरणांचा निषेध आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने बेळगावातील चन्नम्मा चौकात चाबूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले.

आंदोलनादरम्यान माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी पावसाअभावी राज्यातील, विशेषतः बेळगाव जिल्ह्यातील, शेती मोठ्या संकटात सापडल्याचा दावा केला. अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी धरणांमधील पाणीसाठा, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या ऊसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

माजी आमदार संजय पाटील यांनी सरकारवर टीका करत ग्रामीण भागातील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. विकासकामांपेक्षा राजकीय घडामोडींना प्राधान्य दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच जमीन संपादनाविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांसाठी तातडीने आर्थिक भरपाई जाहीर करावी आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*