LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा*


     मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.  शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका रोहिणी सावंत यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इयत्ता तिसरी 'अ' च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मुक्ता आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली 'ज्ञानाचे भांडार'ही कविता सादर केली. विद्यार्थी अनय जोतिबा खन्नूकर या विद्यार्थ्याने शिक्षक दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.  इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल भित्तीपत्रके  तयार केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक होऊन विद्या देण्याचा अनुभव घेतला. या निमित्ताने शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या कविसंमेलन आणि बौद्धिक खेळांच्या गटकार्यातून उत्साहपूर्ण वातावरणात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.


   यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, पर्यावरणवादी कार्यकर्ते  डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांनी विद्यार्थी आणि समाज घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप मोलाची असल्याचे सांगून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शाळा सुधारणा समिती उपाध्यक्ष सुरेश पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, समन्वयक नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर ,शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*आंदोलनापूर्वीच ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील आंदोलनाआधी मोठी कारवाई**राजकीय रणनीती, निवडणूक सर्वेक्षण अन् डिजिटल प्रचार; बेळगावात ‘STRATAGEM Matrix’चे नवे कार्यालय सुरू**दुर्गामाता दौडीपूर्वीच शास्त्री नगरमधील रस्त्याची दुरवस्था; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर**Skyworld Aviation Academy मध्ये मॉकटेल प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी दाखवली सर्जनशीलता आणि आत्मविश्वास**नाना पाटेकरांना रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली; अजित औरवडकर यांची 8 तासांची कलासाधना**संकेश्वरजवळ भीषण अपघात! टिपरला केएसआरटीसी बसची धडक; चालकाचा मृत्यू, 12 प्रवासी गंभीर**विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धाला प्रारंभ**राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव च्या स्केटिंग पटू ची चमकदार कामगिरी**मृणाल हेब्बाळकर यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली**कर्नाटकात जिल्हा-तालुका पंचायत निवडणुकीची तयारी वेगवान; आरक्षणाची अधिसूचना जारी*