बेळगावी : मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल, बेळगाव च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले. विद्यार्थ्यांनी विविध मैदानी व क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करून 4 सुवर्णपदके व 1 रौप्यपदक मिळविल्याचे शाळेच्या उपलब्धी फलकावर नमूद करण्यात आले आहे.
या स्पर्धेत ४×१०० मीटर रिलेमध्ये सक्षम पी. कुंभार, समक्ष पी. कुंभार, प्रसाद पी. पाटील व वेदांत कामती यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ४×४०० मीटर रिलेमध्ये समक्ष पी. कुंभार, कमलेश एम. तिम्मनाचे, प्रसाद पी. पाटील व वेदांत कामती यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
ज्युडो 50 किलो वजनी गटात वैभव एस पाटील यानी प्रथम क्रमांक मिळविला
कराटे ४५ किलो वजनी गटात श्रीनाथ एम गिर्याळकर याने प्रथम क्रमांक मिळवून आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली.
या यशाबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा.श्रीमती.डॉ.राजश्री नागराजू मॅडम यांचे प्रोत्साहन मिळाले, तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री बी.एम. पाटील सर, आणि क्रीडा शिक्षक मा.श्री कल्मेश हैबत्ती सर व तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी बळ मिळाले आहे.

