LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी*

 

    येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील संगणक शिक्षिका पद्मजा कुऱ्याळकर व अटल लॅबच्या शिक्षिका स्नेहा कुप्पेकर उपस्थित होत्या. यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर  

'वैष्णव जन तो'हे भजन शिक्षकांनी संगीत विभागाचे शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या साथीने म्हटले.

गांधीजींनी देशात 'चले जाव' (भारत छोडो), 'असहकार आंदोलन' आणि 'दांडी यात्रा' यासारखी मोठी आंदोलने उभारली आणि देशाला स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आणून उभे केले. ते समाजसुधारकही होते. त्यांनी स्वच्छता, स्वावलंबन (खादीचा वापर) आणि अस्पृश्यता निवारण यावर आयुष्यभर भर दिला. स्वच्छता व शिक्षणाला महत्त्व त्यांनी दिले. अशा शब्दात प्रमुख पाहुण्या पद्मजा कुऱ्याळकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.तर

शास्त्रीजींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला. त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि विचार उच्च होते. ते अत्यंत प्रामाणिक, देशभक्त आणि खंबीर नेते होते.अशा शब्दांत स्नेहा कुप्पेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेतील वेगवेगळ्या भागातील स्वच्छता केली.

यावेळी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर,सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी कुंदा नगरी सज्ज* *बिर्ला शाळेच्या वतीने आयोजित** ज्योती सेंट्रल स्कूल ची अभिमानास्पद कामगिरी!गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांचा बेळगावात सत्कार*देसूरच्या शाळेसाठी 5 एकर जमीन मिळवणार; ₹50 लाखांत ग्रंथालय उभारण्याची लक्ष्मी हेब्बाळकरांची घोषणा**बेळगावच्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेची’; अभय पाटलांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर सतीश जारकीहोळींचा टोला**राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये समीक्षा कर्तस्करची दमदार कामगिरी; SGFI राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड**काकतीत थंडीमध्ये असहाय अवस्थेत आढळले आजोबा; समाजसेवकांच्या तत्परतेने जिल्हा रुग्णालयात दाखल बातमी**द. म. शीक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल च्या ध्यानेश संदीप बामणे याची बेळगाव च्या फुटबॉल जगतात उत्तुंग भरारी*🌟 नेतृत्व, सेवा आणि मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात! 🌟*बेळगावमध्ये 29 नोव्हेंबरला ‘हिंडाल्को नम्मा बेळगावी मॅरेथॉन’; 1000 धावपटूंचा सहभाग अपेक्षित*