बेळगाव : शहरात पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धोकादायक मांजामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध पोलीस अधिकाऱ्यांनी मांजा विक्रीची दुकाने, विक्रीची ठिकाणे आणि पतंग उडविण्याच्या परिसरात छापे टाकून संबंधित साहित्य जप्त केले.
शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही कारवाई करण्यात आली. मांजामुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्ष्यांना इजा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
शहरात कुठेही धोकादायक मांजाची विक्री सुरू असल्याचे किंवा त्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
D Media News | बेळगाव

