Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

अर्चना संगीत विद्यालय तर्फे "स्वर सौरभ" कार्यक्रम :

अर्चना संगीत विद्यालय तर्फे "स्वर सौरभ" कार्यक्रम :


गुरुपौर्णिमेच्या  निमित्ताने तसेच स्वर्गीय श्री. रामभाऊ बिजापूरे सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, अर्चना संगीत विद्यालयातर्फे "स्वर-सौरभ" या संगीत कार्यक्रमाचे   आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयएमईआर हॉल, हिंदवाडी, बेळगाव येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय आशा भोसले यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, वर्षा ऋतुवर   आधारित सुरेल गीतांचा बहार रसिकांना अनुभवता येईल. 
या कार्यक्रमात अर्चना संगीत विद्यालयाचे ७५ हून अधिक विद्यार्थी आपल्या सुरेल गायनातून गुरूवंदना सादर करतील.

या कार्यक्रमास श्री. अनिल चौधरी, श्री. संजीव अध्यापक, सौ. कुसुमताई कुलकर्णी, श्री. महेश इनामदार आणि श्री. पराग चिटणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्व संगीतप्रेमी, रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन विद्यालयाच्या संचालिका सौ.अर्चना बेळगुंदी यांनी केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
अर्चना संगीत विद्यालय तर्फे "स्वर सौरभ" कार्यक्रम :लोकमान्य टिळक पुण्यतिथी : बेळगावात किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली अभिवादनबेळगावमध्ये भीषण अपघात; भरधाव कारने चिरडल्या 48 हून अधिक मेंढ्या*मराठी विद्यानिकेतनमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी**गृह ज्योती योजनेचा लाभ 82 हजार कुटुंबांच्या धोक्यात; पडताळणीला नकार महागात पडणार**पोलीस भरती परीक्षेपूर्वी मोठा इशारा; गैरप्रकार केल्यास 12 वर्षांपर्यंत तुरुंगवास**बेळगावात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; 96 टेट्रा पाऊच जप्त**स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी**पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा बेळगावातील स्वयंसेवी संस्थांकडून गौरव**बजरंग पाटील यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) पदवी संपादन करून यशाची नवी भरारी*