LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

*मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये नवमतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

बेळगाव, दि. २२ सप्टेंबर २०२६ :
मराठा मंडळ पॉलिटेक्निक, बेळगाव येथे भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी व मतदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमात महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून आपली मतदार म्हणून नोंदणी केली.

मतदानाचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, तरुणांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी जबाबदार नागरिक म्हणून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. सूर्यवंशी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NSS समन्वयक जी. के. शिवयोगीमठ तसेच विद्यार्थी सचिवांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या नियोजनातून नवमतदार नोंदणी आणि मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे पार पडला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
रायबागच्या राजवाडे जंगलात 60-65 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह; मृत्यूबाबत संशय*विद्याभारती राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी बेळगावचे खेळाडू रवाना**मिनी ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा भारतेश एज्युकेशन ट्रस्टतर्फे गौरव; आयुषी धामणेकरला सुवर्ण, अर्णव गोद्याळकरला रौप्य**असद खान सोसायटीच्या विकासाला गती; आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते ₹2.55 कोटींच्या रस्ते-ड्रेनेज कामांना सुरुवात**बेळगाव अधिवेशनात विकासाच्या मुद्द्यांवर भर; आमदारांची उपस्थिती वाढवण्यासाठी कठोर उपाययोजना**सी बी एस ई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दक्षिण विभागीय स्केटर्स टॉप**🧠 मेंदू, मानसिक संतुलन आणि मर्यादा – मनाचे संगोपन, आत्मविश्वासाची जडणघडण!**आजचे राशीभविष्य, २१ नोव्हेंबर २०२६ : कोणत्या राशीला मिळणार यशाची संधी? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस**मराठी विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये गणित विषयाची कार्यशाळा संपन्न*कार्तिक स्वामी दर्शनासाठी बेळगाव सज्ज; कपिलेश्वर मंदिरात 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दर्शन