LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

*मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल खानापूर पालक मेळावा ( त्रिवेणी संगम) संपन्न*

मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल येथे दहावीच्या विद्यार्थिनींचा पालक मेळावा म्हणजेच बालक, पालक आणि शिक्षक यांचा सोहळा संपन्न.

दहावीची बोर्ड परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची परीक्षा नसून विद्यार्थिनींच्या मेहनतीची आत्मविश्वासाची आणि नियोजनाची कसोटी असते याच उद्देशाने आज मराठा मंडळ ताराराणी विद्या मंदिरामध्ये त्रिवेणी संगम पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. 

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची देवता माता सरस्वतीच्या वंदनेने करण्यात आली. ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन या त्रिवेणी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक  श्री राहुल एन जाधव हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत शाळेचे सहशिक्षक श्री व्ही एस मुन्नोरकर  सर यांनी केले. या सोहळ्याला दहावी वर्गाचे पालक  उपस्थित होते.  पालक श्री मल्लेशी नायक, श्री जोतिबा अंधारे व  श्रीमती मंदिरा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी सुद्धा मार्गदर्शन केले. श्रीमती ममता एन पाटील मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. 

शेवटी अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक राहुल एन जाधव यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये या सोहळ्याचे मुख्य उद्देश व बोर्ड परीक्षेच्या तयारीचा आढावा अभ्यासाचे योग्य नियोजन व मागील वर्षी प्रमाणे मराठी माध्यमात कर्नाटक राज्यात प्रथम येण्याची परंपरा सातत्याने अबाधित ठेवण्याचे पालकांना समन्वय निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एल आर पाटील सर यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पी एल तरले सर यांनी केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावमध्ये राज्य मराठी विकास संस्था व विश्वभारत सेवा समितीतर्फे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न**बेळगावात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; ४४,१७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार!**बेळगावात धनंजय जाधव यांचा सामाजिक उपक्रम; ग्रामीण आणि शहर परिसरात २५ हजार उटण्यांच्या पाकिटांचे वाटप!**शेतकऱ्यांची संमती असेल तरच साखर कारखाने सुरू होणार; सतीश जारकिहोळी यांचे मोठे वक्तव्य**मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल खानापूर पालक मेळावा ( त्रिवेणी संगम) संपन्न**बेळगावमध्ये ‘सृजन-२०२६’ विज्ञान महोत्सवाची रंगत; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ**मास्तमर्डी गावात १.०८ कोटींच्या रस्ता विकासकामाचा शुभारंभ; आमदार चन्नराज हट्टिहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन**बेळगावमध्ये मंगेश मोटर्सचे मारुती सुझुकी अरेना शोरूम सुरू; चौथ्या पिढीचा व्यवसायात प्रवेश**सुरांनी जिंकले चेन्नई! ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी**ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!*