LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन*

 येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये दिनांक 3 नोव्हेंबर 2026रोजी विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षक समन्वयक सविता पवार या उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन ,संशोधन वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलता विकसित करणे हाच विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचा उद्देश.

विद्यार्थिनी आराध्या अष्टेकर हिच्या हस्ते पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.  त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रयोगासाठी योग्य प्रयोगाची निवड करणे तिथूनच शोधक सुरू होतात. त्यामुळे ज्या -ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोग केले ते बालवैज्ञानिकच आहेत. प्रयोगांची सातत्यता वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्यास मदत करते अशा शब्दात प्रमुख पाहुण्या शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात व्यक्त केले.

    शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन्.सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, विज्ञान विषय प्रमुख रुपाली हळदणकर,अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.विज्ञान विषय शिक्षक मंजुषा पाटील, स्नेहल पोटे, विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन विद्यार्थिनी जिया कांबळे हिने तर आभार प्रदर्शन अटल लॅब असिस्टंट स्नेहा कुप्पेकर यांनी केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव ग्रामीण भाजप पदाधिकाऱ्यांची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी भेट; छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे दिले निमंत्रण**बेळगावच्या ज्येष्ठ जलतरणपटूंची आशियाई स्पर्धेत पदकांची कमाई; 84 वर्षीय दास्तगीरसाब अत्तार यांची सुवर्ण कामगिरी**अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन*