LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू*

बेळगाव :
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या मानाच्या अश्वांचा आळंदीच्या दिशेने पवित्र प्रवास सुरू झाला. माऊलींचा अश्व मोती आणि जरीपटक्याचा अश्व हिरा हे दोन्ही मानाचे अश्व तब्बल ३०० किलोमीटरचा प्रवास करत आळंदीकडे रवाना झाले.

अंकली येथील शितोळे घराण्याकडे गेल्या १९४ वर्षांपासून माऊलींच्या अश्वसेवेची परंपरा जपली जात आहे. या परंपरेनुसार आषाढी वारीतील पालखी सोहळ्यासाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्व दरवर्षी अंकलीहून प्रस्थान करतात.

आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व मिळवून देण्यात हैबतबाबा आरफळकर यांचे योगदान मोठे मानले जाते. त्यानंतर माऊलींच्या अश्वांचा आणि तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला. ही परंपरा सध्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार आणि त्यांचे पुत्र महादजीराजे शितोळे सरकार निष्ठेने पुढे नेत आहेत.

अंकली येथील शितोळे राजवाड्यात सकाळी अंबाबाई मंदिरात अश्वपूजन, आरती आणि जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार आणि विहानराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते दोन्ही अश्वांचे पूजन करण्यात आले.

दिंडीसह दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी केली आणि दर्शन घेतले. पारंपरिक मार्गाने मिरवणूक गावच्या वेशीपर्यंत पोहोचल्यानंतर भाविकांनी अश्वांना भावपूर्ण निरोप दिला.

या सोहळ्यास विविध मान्यवर, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्वसेवेची जबाबदारी तुकाराम कोळी आणि अक्षय परीट हे सांभाळणार आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*