LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ*

 डॉ बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती व श्यामकांत दोरगुडे पारितोषिक  वितरण कार्यक्रम 

‌‌बेळगाव: दिनांक 27 जून 2026 रोजी मराठी विद्यानिकेतनचे  इयत्ता दहावी व शाळेच्या बारावीतील  गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर  प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी प्रा. बळवंत पाटील (GIT College ), निवृत्त शिक्षक एस.आर.पाटील , शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष सुरेश पाटील,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी केले. कठोर परिश्रम, जिद्द ,आत्मविश्वास ,अभ्यासातील सातत्य या गोष्टी विद्यार्थ्यांना यशाकडे पोहोचवितात.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. यानंतर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक एस्.आर.पाटील  व  प्रबोधिनी सदस्य सुरेश गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रा. बळवंत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

     सोहम हळदणकर, स्नेहा हिरोजी, अनिकेत जाधव, शिवराज गवळी, उर्वी पाटील, वैजनाथ पाटील, अनुष्का पाटील, श्रेया भातकांडे, उदय हाजगोळकर, ऐश्वर्या कंग्राळकर, स्वरा पाटील, आदिती चोपडे, रघुवीर देसाई, प्रतिज्ञा कुंभार, अक्षरा मेलगे, अक्षय शिंदे , समीक्षा पाटील, समीर पाखरे,  निखिल कुंभार, शर्वरी आनंदराव, श्रद्धा गिंडे, श्रेया घोळसे, आशिष तरळे, श्रेया सांबरेकर, श्रवण खुडे, विनायक तिळवे या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी जाहीर केलेली बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. बारावीमध्ये यशस्वी झालेले माजी विद्यार्थी प्रेरणा पाटील, प्राजक्ता नातू, पार्थ हदगल, कुशल गोरल, भक्ती कदम, रेणुका भातकांडे, श्रावणी सायनेकर या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. 

       शिक्षण हे केवळ साक्षर समाजासाठी नाही तर सुशिक्षित समाजासाठी हवे. चारित्र्य, करुणा हवी. शिक्षण हे समाजाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आंबेडकरांनी प्रयत्न केले. त्यांच्या नावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात आली.  दरवर्षी मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला श्यामकांत दोरगुडे पारितोषिक रोख रुपये  11000   देण्यात  येते.हा सन्मान स्नेहा हिरोजी हिला मिळाला.प्रेरणा पाटील व सोहम हळदणकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रा. बळवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना  पुढील शिक्षणासंबंधी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे एस्.आर .पाटील यांनी विद्यार्थ्यांचे गुण अभिमानास्पद आहेत असे सांगितले.

विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता आपला सर्वांगीण विकास साधावा असे आपले मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी व्यक्त केले. शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी आभार मानले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, बालवाडी ते दहावी पर्यंतचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*