Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी*

समतेचे पुरस्कर्ते, बहुजनांचे उद्धारकर्ते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती  'महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव' यांच्या वतीने युवा समिती कार्यालयात  साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे खजिनदार विनायक कावळे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष अंकुश केसरकर यांनीही पुष्प अर्पण करत अभिवादन केले.

यानंतर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाचा सविस्तर आढावा घेतला. शाहू महाराजांनी शिक्षण, कृषी, अस्पृश्यता निवारण आणि रंजल्या-गांजल्यांच्या कल्याणासाठी दिलेले अभूतपूर्व योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला.

"शाहू महाराजांचे पुरोगामी विचार आणि त्यांनी लावलेले समतेचे रोपटे आजच्या काळातही आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे," असे मत श्रीकांत कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, आनंद पाटील, श्रेयांश कृष्णाचे  उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अनाथ मुलांना चांदीच्या वस्तू देऊन  मामाची भूमिका निभावणारे समाजसेवक आकाश हलगेकर* ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थीनींचा दैदिप्यमान विजय; आंतरशालेय स्पर्धेत प्रथम क्रमांकावर मोहोर !डॉ. दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांशी सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा*चन्नेवाडी गावकऱ्यांच्या स्वतंत्र बूथ मागणीला यश**आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचा दमदार विजय; तालुका पातळीसाठी निवड**सीमाप्रश्नी पुणे विभाग समितीकडून घरोघरी जनजागृती अभियान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व पुणे विभाग समितीची संयुक्त बैठक**भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा**मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे शालेय मंत्रिमंडळाची लोकशाही पद्धतीने निवडणूक संपन्न**उत्तर कर्नाटकात रौडींवर पोलिसांचा कडक वॉच! ५३ पथकांची विशेष मोहीम; २३ जण हद्दपार बेळगावसह पाच जिल्ह्यांत जुलैमध्ये मोठी कारवाई; १४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ६ जणांवर गुंडा कायदा, पाच आरोपींवर ‘कोका’**बेळगाव–गोवा व्यावसायिक संबंधांना नवी दिशा; सौहार्द अधिक मजबूत करण्याचे आवाहन बीसीसीआयच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; स्वप्नील शहा यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे*