पदव्युत्तर विभागांची उल्लेखनीय कामगिरी
साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गोविंदराम सेक्सरिया विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), बेळगाव येथे स्वायत्ततेअंतर्गत शिक्षण घेतलेल्या पहिल्या पदव्युत्तर (एम.एस्सी.) बॅचचा निकाल गुरुदेव रानडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एस.के.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष प्रा. एस. वाय. प्रभू होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.के.ई. सोसायटीचे सचिव श्री. मधुकर सामंत उपस्थित होते. श्री. कीथ मचाडो यांनी कार्यक्रमास मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अभय सामंत आणि परीक्षा नियंत्रक प्रा. एम. एस. नागसुरेश उपस्थित होते.
प्रारंभी परीक्षा नियंत्रक प्रा. एम. एस. नागसुरेश यांनी निकालाची घोषणा केली. स्वायत्ततेतील पहिल्या पदव्युत्तर बॅचने उत्कृष्ट निकालाची नोंद करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रचीती दिली.
निकालाचा आढावा
विभाग उत्तीर्णतेचे टक्केवारी
M.Sc. Chemistry (II Semester) : 78.95%
M.Sc. Chemistry (IV Semester) : 95.45%
MSc. Microbiology (II Semester) : 100%
MSc. Microbiology (IV Semester) : 100%
MSc Zoology (IV Semester) : 100%
MSc. Botany (IV Semester) : 100%
MSc Environmental Science (IV Semester) :100%
अध्यक्ष श्री .एस. वाय. प्रभू यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत स्वायत्ततेतील पहिल्याच पदव्युत्तर बॅचने उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि लौकिकाला अधिक उंचीवर नेल्याचे गौरवोद्गार काढले..
यावेळी बोलताना प्राचार्य प्रा. ए. के. सामंत यांनी सांगितले की, जीएसएस महाविद्यालयात Organic Chemistry, Microbiology, Environmental Science, Botany आणि Zoology या विषयांमध्ये एम.एस्सी. पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, Organic Chemistry, Microbiology आणि Environmental Science या विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी जीएसएस महाविद्यालय ही या परिसरातील एकमेव संस्था आहे. या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन आणि करिअर विकासासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध होत आहेत.
प्रमुख पाहुणे श्री. मधुकर सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे नमूद केले.
निमंत्रित मान्यवरांनी देखील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
