LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या*

बेळगाव : नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी जनतेशी थेट संवाद साधण्याच्या उपक्रमांतर्गत Asif Raju Sait यांनी वेलकम हॉल परिसरातील फॉर्च्युन कॉलनीला भेट देत जनता दरबार आयोजित केला.

या भेटीदरम्यान आमदारांनी परिसराची पाहणी करत स्थानिक नागरी सुविधांची स्थिती जाणून घेतली. रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची स्वच्छता, स्वच्छता व्यवस्था तसेच इतर स्थानिक विकासाशी संबंधित प्रश्न नागरिकांनी त्यांच्या समोर मांडले.

नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत आमदार आसिफ राजू सेठ यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून शक्य तितक्या लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. जनतेशी थेट संवाद साधण्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती मिळते आणि प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करणे सोपे होते, असे त्यांनी सांगितले.

या जनता दरबारावेळी परिसरातील नागरिक, स्थानिक प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*