LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*२७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी; ‘अॅनिमिया मुक्त बेळगाव’साठी रोटरी क्लबचा पुढाकार*

 शालेय विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाचे (अॅनिमिया) प्रमाण वेळेत ओळखून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ‘अॅनिमिया मुक्त बेळगावी’ हा आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. हॅपीहार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या तपासणी शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शिबिरादरम्यान तब्बल २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये अॅनिमियाची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन त्यांच्या आरोग्य आणि पोषणस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली.

बालकांच्या आरोग्याशी संबंधित या उपक्रमाच्या आयोजनासाठी विविध स्तरांवरून सहकार्य मिळाले. शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल पर्याय फाउंडेशनचे रोटरी क्लबतर्फे आभार मानण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच अॅनिमियासारख्या समस्येचे लवकर निदान व्हावे, यासाठी अशा आरोग्य तपासणी उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

समाजातील बालकांच्या आरोग्याला प्राधान्य देत सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचा क्लबचा संकल्प या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!**मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत