LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*हनुमाननगरात 70 लाखांच्या निधीतून गार्डन विकासकामांचा शुभारंभ*

 शहरातील हनुमान नगर येथील मारुती मंदिर परिसरात नागरिकांसाठी अधिक आकर्षक आणि उपयुक्त सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने गार्डन विकास प्रकल्पाला आज औपचारिक सुरुवात करण्यात आली. या विकासकामासाठी 70 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार असिफ राजू शेट यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला.

या प्रकल्पाअंतर्गत गार्डनचे सुशोभीकरण, नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तसेच आधुनिक ओपन जिम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व्यायाम, विरंगुळा आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी दर्जेदार सार्वजनिक जागा उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासकामांचे स्वागत केले. यावेळी युवा नेते अमान शेट यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे अंजनेय नगर परिसरातील सार्वजनिक सुविधांमध्ये लक्षणीय भर पडणार असून, भविष्यात हा परिसर अधिक सुशोभित आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!**मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत