LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*डॉ.संजय पंतबाळेकुंद्री यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा पुरस्काराने सन्मानित*

प.पू.कै.डॉ.रमेश महाराज अकोळकर यांचा १५वा पुण्यतिथी सोहळा श्री दत्त-पंढरी (अकोळ) येथे संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ.संजय पंतबाळेकुंद्री यांचा "प.पू. सद्गुरु डॉ. रमेश महाराज अक्कोळकर  प्रतिष्ठान" यांच्यावतीने २०२६ सालचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.अनिकेत महाराज कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण झाले. 

गेली तीन पिढ्या शतकोत्तर निरंतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या पंतबाळेकुंद्री घराण्याचा गौरव म्हणून तसेच महापुरातील वैद्यकीय सेवा, कोविड महालाटेतील विनामूल्य सेवा कार्य, आध्यात्मिक ,सामाजिक व शैक्षणिक अशा अनेक अविरत सुरू असणाऱ्या सेवेचा सन्मान म्हणून हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला . 
सोबतच डॉ.ईश्वर ढोले (बालरोग तज्ञ) निपाणी यांचाही वैद्यकीय सेवा योगदान बद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला .

कोल्हापूर येथील प्रसिद्ध गायिका सौ.रमा कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गायन सेवा अतिशय उत्तमरीत्या केल्यामुळे त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

दत्त पंढरी मंदिर येथील अविरत सेवेकऱ्यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
दुपारी अभिषेक, आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील व विविध भागातून गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५/८/२६.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचे साहित्यिक मावळे तंजावरकडे रवाना!**मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व पुणे विभागाची संयुक्त बैठक**खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?**मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती**कपिलेश्वर विसर्जन तलावाची तयारी दोन दिवसांत पूर्ण करा; आयुक्त कार्तिक यांचे निर्देश**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय शाळेत नवीन इंटरॅक्ट क्लबची स्थापना**तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीराला विजेतेपद**मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत