LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावच्या विकासाला ब्रेक? निधीवरून आमदार अभय पाटील आक्रमक*

राज्य सरकारने गेल्या जवळपास तीन वर्षांत बेळगाव शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही विशेष निधी उपलब्ध करून दिलेला नसल्याचा गंभीर आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला. निधीअभावी शहरातील अनेक विकासकामे रखडली असून, याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मंगळवारी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, २००८ पासून ते मागील सिद्धरामय्या सरकारच्या कार्यकाळापर्यंत बेळगाव शहरासाठी दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला जात होता. मात्र, विद्यमान सरकार सत्तेवर आल्यानंतर तीन वर्षे उलटूनही शहरासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, निधीअभावी त्यांच्या मतदारसंघातील सुमारे २०० हून अधिक मंदिरे आणि समुदाय भवनांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम अपूर्ण असून काही ठिकाणी दरवाजे, खिडक्या आणि इतर अंतिम कामे रखडल्याने या इमारती नागरिकांच्या वापरासाठी खुल्या करता आलेल्या नाहीत.

शहरातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचा दावा करत त्यांनी खड्डे बुजविणे आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले.

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचा आरोप करत विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली. बेळगावसह राज्यातील रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न आगामी पावसाळी अधिवेशनात ठामपणे उपस्थित करून सरकारकडे जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*