LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा.

विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा.

 क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूंच्यात शिस्त जिद्द व संघ भावना निर्माण होते. रोहिणी पाटील.

 बेळगाव तारीख, 15. क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूमध्ये  शिस्त, जिद्द, आणि संघ भावना निर्माण होते बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडाक्षेत्राचा फायदा घेऊन राज्य,राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्वल करावे व खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रासाठी  कठोर मेहनत व सातत्य ठेवण्याचे आव्हान एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय ज्युडो खेळाडू रोहिणी पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्याभारती स्पर्धेच्या  उद्घाटन प्रसंगी उदगार काढले.
 नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत  संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील,लैला शुगर फॅक्टरीचे संचालक सदानंद पाटील, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी अशोक शिंत्रे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर सचिव एस व्ही कुलकर्णी संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थित होते.प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले यानंतर राष्ट्रीय शालेय क्रीडापटू अनिरुद्ध हलगेकर संचित धामणेकर समर्थ पानारी श्रेयस किल्लेकर ,यश हळसीकर, भावना बेर्डे सृष्टी सातेरी श्रेया लाटुकर मेघा कलखाबकर, या खेळाडूंनी मैदानाभोवती क्रीडाजोत फिरवून पाहुणे यांच्याकडे सुपूर्द केली खेळाडू चंदन श्रेयस यांनी सहभागी खेळाडूंना शपथ देवविली,यानंतर पाहुण्यांचे हस्ते ओमकार सरस्वती भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केली. याप्रसंगी क्रीडाशिक्षक अनुराधा पुरी शिवकुमार सुतार ओंकार गावडे श्रीकांत कांबळे शुभांगी काकतकर स्वाती सावंत गंगा गाणीकोप्प, हर्ष रेडेकर, प्रीती भांदुर्गे,श्रद्धा ढवळे,श्रुती सावंत,सोहेल विजापूरे, सृष्टी भोंगाळे संभवी स्वामी प्रतीक एच, बसवंत पाटील शामल दड्डीकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी तर प्रेमा मेलिनमनी यानी आभार मानले. या स्पर्धेत संत मीरा अनगोळ, संत मीरा गणेशपुर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळी, हनिवेल स्कूल खानापूर, ज्ञान प्रबोधनी स्कूल रामदुर्ग  शाळेच्या 
350 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*