Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला प्रारंभ*

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीला आजपासून बेळगावात प्रारंभ झाला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही तीन दिवस बैठक चालणार आहे.

क्षेत्र प्रचारक, सह क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचारक असे एकूण संघाच्या 46 प्रांताचे प्रमुख बैठकीला उपस्थित आहेत. या बरोबरच संघाशी संबंधित संस्थांचे संघटन मंत्री देखील बैठकीत सहभागी झाले आहेत. संघातर्फे वेगवेगळ्या पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराचा आणि संघाच्या शाखेत राबविण्यात येणाऱ्या योजनावर बैठकीत चर्चा होणार आहे.

आगामी काळात संघाच्या शाखा वाढविण्याच्या दृष्टिने बैठकीत विचार विनिमय केला जाणार आहे. संघाच्या शताब्दी पूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम आणि पुढील काळात करायचे कार्यक्रम याविषयी चर्चा आणि नियोजन केले जाणार आहे.

सरसंघचालकांच्या पुढील वर्षातील प्रवास यावर देखील चर्चा बैठकीत होणार आहे. बेळगावात होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
महिला PSIच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; हिंडलगा कारागृहाची बदनामी केल्याचा आरोपअगसगा गावात आयुष्मान आरोग्य केंद्राचे भूमिपूजन; ५५ लाखांच्या कामाला सुरुवात*बेळगाव महापालिकेची नवी सुविधा; झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी अत्याधुनिक यंत्राची खरेदी**वडगावात शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक; बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीवर ठोस निर्णयाची तयारी**बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात**श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न**दिल्लीमध्ये आमदार अभय पाटील यांच्या कारला भीषण अपघात; इनोव्हा-स्विफ्टची धडक, सर्वजण सुखरूप**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.