LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News | Sports News

*अभय कश्यप मिस्टर इंडिया २०२६चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स*

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या अभय कश्यप याने ‘मिस्टर इंडिया २०२६’चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. तसेच गुजरातमधील वापी येथील मनीष सरोज याने पुरुष फिजिक्स प्रकारात ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स २०२६’ हा किताब जिंकला.

इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा जयपूरमधील निर्मला ऑडिटोरियम हॉल येथे पार पडली. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. एकूण नऊ वजनगटांत झालेल्या या स्पर्धेत सुमारे १८० स्पर्धकांनी आपले कौशल्य आणि शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन केले.

अभय कश्यप याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत ‘मिस्टर इंडिया २०२६’चा सर्वोच्च किताब आपल्या नावावर केला. तर मनीष सरोज याने पुरुष फिजिक्स प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा मान मिळवला.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी जयपूरमधील फिट लीग फिटनेस इक्विपमेंट यांनी पुढाकार घेतला. राजस्थान शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव शिवराम थापा यांनीही स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेच्या परीक्षक मंडळात इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सचिव सुरेश कदम यांच्यासह बलबीर सिंग, अनिल अंबरोळे, मनोरंजन लोलिता, भावेश, अमरदीप, दिलीप मेंडिस, दर्शन, डॉ. बी. पी. रेड्डी, के. जी. राव, जोग किरण, रूपक विश्वास, टी. रामू, गुरुनाथ, मनोरंजन शर्मा आदींनी काम पाहिले.

या राष्ट्रीय स्पर्धेमुळे देशातील शरीरसौष्ठवपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. अभय कश्यप आणि मनीष सरोज यांच्या किताबविजेतेपदामुळे शरीरसौष्ठव क्षेत्रात त्यांच्या कामगिरीची विशेष दखल घेतली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*आखाड्याच्या नियोजनासाठी मध्यवर्ती कुस्ती संघटनेची २५ ऑक्टोबरला बैठक**अभय कश्यप मिस्टर इंडिया २०२६चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स**' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून मानाची साडी-चोळी**बेळगावच्या NCC कॅडेट्सचा गौरव; कर्नाटक-गोवा संचालनालयाचा सलग चौथ्यांदा विजय**वैशाली सुतार यांची गोवा काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती**जागतिक स्केटिंग स्पर्धेत सहभागी देवेन बामणेचे बेळगावात स्वागत**बेळगाव ग्रामीणमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह; लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतले देवीचे दर्शन*श्रीपंत बाळेकुंद्री महाराजांचा १२१ वा पुण्यतिथी उत्सव.कंग्राळी बी.के. येथे गोपाळ महाराजांचे देवी महात्म्यावर प्रवचन; भाविकांची उपस्थिती*खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता.पं. निवडणुका जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन*