LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*बेळगावमध्ये ‘F3 फन फूड फेस्ट’ ठरला सांस्कृतिक उत्सवाचा संगम; स्कायवर्ल्ड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम*

बेळगावमध्ये ‘F3 फन फूड फेस्ट’ ठरला सांस्कृतिक उत्सवाचा संगम; स्कायवर्ल्ड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

बेळगांव:स्कायवर्ल्ड एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अकॅडमी, बेळगाव येथे दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला ‘F3 – Fun Food Fest’ हा उपक्रम उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या अनोख्या महोत्सवात भारतातील विविध राज्यांची समृद्ध संस्कृती, पारंपरिक खाद्यपरंपरा आणि लोककला प्रभावीपणे मांडण्यात आली.

या फूड फेस्टमध्ये कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या राज्यातील पारंपरिक पदार्थ, हस्तकला, वेशभूषा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना केवळ पदार्थच नव्हे तर त्या मागील इतिहास, परंपरा आणि संस्कृतीची माहितीही समजावून सांगितली.

कार्यक्रमादरम्यान पारंपरिक संगीत, लोकनृत्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि सांस्कृतिक जाणीव विकसित करणे हा होता, जो यशस्वीपणे साध्य झाल्याचे चित्र दिसून आले.

स्कायवर्ल्ड एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अकॅडमीच्या या उपक्रमाचे पालक, पाहुणे आणि शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी