मराठा सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक अर्पण करून वाहिली श्रद्धांजली
बेळगांव :जम्मू काश्मीरच्या पुंच्छ जिल्ह्यातील भीषण अपघातात शहीद झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील दोन जवानांचे पार्थिव मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे गुरुवारी आणण्यात आले.यावेळी सेंटरच्या वतीने
पार्थिवांना मानवंदना देण्यात आली.कर्नाटकचे
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली.
मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर मधील
युद्ध स्मारकाच्या ठिकाणी शहीद सुभेदार दयानंद तिरकण्णवर आणि महेश मारीगोंड यांच्या पार्थिवाला सैन्य दलातर्फे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूंछ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या
कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी सर्व ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, एच. सी. महादेवप्पा, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळेद आदीसह लष्करी अधिकारी, जवान आणि शहीद जवानांचे नातलग उपस्थित होते.