सीमा वादा संदर्भात केंद्राची समिती करणार काम
सीमा वादा संदर्भात दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले होते. आजची बैठक मुक्त वातावरणात पार पडली. सीमावाद रस्त्याऐवजी लोकशाही मार्गाने संविधान पूर्वक सुटायला हवा. आजच्या बैठकीत काही निर्णय झाले आहेत.
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होत नाही तोपर्यंत दोन्ही राज्ये क्लेम करणार नाहीत.दोन्ही राज्यांनी मिळून सहा मंत्री एकत्र येऊन सीमा प्रश्नावर चर्चा करतील.
दोन्ही राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी एका सीनियर आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. कायदा सुव्यवस्था सुरत करण्याबाबत फेक ट्विटरच्या माध्यमातून ज्येष्ठ नेत्यांच्या नावाने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. असे फेक ट्विटरटर ज्यांनी निर्माण केले त्यांचे विरोधात कारवाई केली जाईल. सर्व निर्णय सर्वांनुमते झाले आहेत. सीमा वादाला राजनीतिक मुद्दा बनविण्यात येऊ नये. दोन्ही राज्यात काँग्रेस, एनसीपी,शिवसेना उद्धव ठाकरे गट सारेजण या निर्णयाला सहकार्य करतील अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा वादावर पार पडलेल्या बैठकीनंतर बोलताना दिली आहे