Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये सी.बी.एस्.ई शालेय शिक्षकांकरिता कार्यशाळा*

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे सी.बी.एस्.ई. शाळेच्या शिक्षकांसाठी दोन दिवसीय विशेष ‘क्षमता विकास कार्यक्रम’ (Capacity Building Program) कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली २९ आणि ३० मे २०२६ रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी ‘वर्ग व्यवस्थापन’ (Classroom Management) हा या कार्यशाळेचा मुख्य विषय होता.

     या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत विविध शहरांतून आलेल्या सी.बी.एस्.ई. शाळांच्या एकूण ६० शिक्षकांनी अत्यंत उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. या दोन दिवस झालेल्या सत्रात भरतेश सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य श्रीमती देवयानी देसाई आणि के.एल.ई. इंटरनॅशनल स्कूलचे गणित शिक्षक श्री. विनायक टोण्णी यांनी संपन्मूल व्यक्ती (Resource Persons) म्हणून लाभले. यांनी सर्व शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

    वर्गातील अध्यापन अधिक प्रभावी करणे, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र समजून घेणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर्ग कसा हाताळावा, यावर मार्गदर्शकांनी सविस्तर प्रकाश टाकला. प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या प्रेरणेने आणि ‘एकत्र शिकूया, समृद्ध होऊया’ या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन सर्व शिक्षकांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यासाठी शालेय उपप्राचार्या श्रीमती सोनाली कंग्राळकर आणि शाळेच्या पी.आर.ओ श्रीमती उर्मिला किल्लेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.  

     शेवटी शिक्षिका श्रीमती कृपा कदम यांनी सर्व मार्गदर्शक व उपस्थित शिक्षकांचे आभार मानून कार्यशाळेची यशस्वी सांगता केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमत अभिवादन**नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात; बेळगावातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण**कंग्राळी (खुर्द) मराठी शाळेला 1989 ते 96 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिल्या पन्नास खुर्च्या भेट**बेळगावातील वकिलांकडून आयजीपी संदीप पाटील यांचा विशेष सत्कार**झाडे लावा झाडे जगवा स्केटिंग रॅली द्वारे संदेश**धाराशिवच्या साहित्य संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार**बेळगाव वाहनधारकांना दिलासा मिळणार? गोवा CM प्रमोद सावंत यांना निवेदन**बिजगर्णीत 2 व 3 जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव; धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी**ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये सी.बी.एस्.ई शालेय शिक्षकांकरिता कार्यशाळा**बेळगावातील प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार*