LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*कॅन्टोनमेंट प्राथमिक मराठी मुलांची लोकमान्य ग्रंथालयाला भेट*

कॅन्टोनमेंट प्राथमिक मराठी मुलांची लोकमान्य ग्रंथालयाला भेट

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आरपीडी सर्कल जवळील लोकमान्य बाल ग्रंथालयाला भेट दिली .बाल ग्रंथालयाच्या वतीने छाया सुतार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून झाली.त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले 'आला किनारा' हे गीत सादर करून त्यांना अभिवादन केले.

शाळेच्या विद्यार्थिनी श्रेया गावडे व ईशानी पाटील यांनी मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे, ब्रँड अँबॅसीडर संतोष दरेकर,शिक्षक उदय पाटील, ग्रंथालयाचे व्यवस्थापक नागेश जन्नू , छाया सुतार उपस्थित होते.

सुतार यांनी लोकमान्य सोसायटीच्या वतीने शाळेतील मुलांना वाचनाची गोडी लागून त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी लोकमान्य बाल ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली असून या ग्रंथालयांच्या वतीने मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी मुलांना पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्यात येते. याचा शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

लोकमान सोसायटीच्या वतीने मुलांना बोधात्मक संस्कारशील असे बाल चित्रपट दाखवण्यात येतात.शाळेच्या मुलांनी उबंटू या चित्रपटाचा आनंद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा सावंत हिने केले तर आभार अदिती आजरेकर हिने केले.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे यांनी ग्रंथालयाच्या संचालिका डॉ. शोभा नाईक व इतर कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले.यावेळी शाळेचे शिक्षक धनाजी कुरणे,श्रीकांत काटकर, तुषार कांबळे,नीता गुंजीकर,मनीषा वड्डगोळ,रेणुका अंबी, रेणुका सरमळकर त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*