LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

वैशाली सुतार यांची राष्ट्रीय पातळीवर झेप! भरण्णा उप्पार यांच्याकडून विशेष सन्मान

AICC मागासवर्गीय महिला विभागाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी आणि गोवा राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल वैशाली सुतार यांचा गौरव

बेळगाव : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) मागासवर्गीय महिला विभागाच्या नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस आणि गोवा राज्याच्या प्रभारी वैशाली सुतार यांचा कर्नाटक सरकारच्या उप्पार समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष भरण्णा उप्पार यांच्या नेतृत्वाखाली विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

समाजकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करत राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळवणाऱ्या वैशाली सुतार यांच्या यशाचे यावेळी कौतुक करण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीमुळे महिला आणि तरुण पिढीला सार्वजनिक जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास महामंडळाचे अध्यक्ष भरण्णा उप्पार आणि समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस वैशाली सुतार यांनी, आपल्यावर विश्वास ठेवून महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याबद्दल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे तसेच सातत्याने पाठिंबा देणाऱ्या समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.

वैशाली सुतार यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावात वाल्मिकी जयंती शोभायात्रेचा उत्साह! मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा**बेळगावात स्वच्छतेच्या खऱ्या नायकांचा गौरव! रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ४० जणांचा सन्मान**बेळगावात आंतरराज्य चोरीचा पर्दाफाश! रेल्वे ट्रॅकजवळ बनावट नंबर प्लेटची स्कॉर्पिओ आणि ३० लाखांचे तांब्याचे साहित्य जप्त**बेळगाव उत्तरमध्ये रस्ते विकासकामांना सुरुवात; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ!*काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन!बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य पथसंचलन; ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत!वैशाली सुतार यांची राष्ट्रीय पातळीवर झेप! भरण्णा उप्पार यांच्याकडून विशेष सन्मानकाळ्या दिनाच्या फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होणार; महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार!*जैन कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय ICCMN-2026 परिषदेला प्रारंभ; विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधनाकडे वळावे!*प्रा. के. डी. मंत्रेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली; डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात कार्यक्रम