LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य पथसंचलन; ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत!

सरदार मैदानापासून सुरुवात; घोष पथकाने वेधले लक्ष, लिंगराज कॉलेजच्या मैदानावर सांगता

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगाव शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनात संघाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध ठिकाणी रांगोळ्या, स्वागत कमानी आणि पुष्पवृष्टीद्वारे पथसंचलनाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

बेळगावातील सरदार मैदानापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. पथसंचलनाच्या अग्रभागी असलेल्या घोष पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनाने शहरातील नागरिकांचे लक्ष आकर्षित केले.

पथसंचलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा घालून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारून पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

सरदार मैदानापासून सुरू झालेल्या या पथसंचलनाची सांगता लिंगराज कॉलेजच्या मैदानावर झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावात वाल्मिकी जयंती शोभायात्रेचा उत्साह! मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा**बेळगावात स्वच्छतेच्या खऱ्या नायकांचा गौरव! रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ४० जणांचा सन्मान**बेळगावात आंतरराज्य चोरीचा पर्दाफाश! रेल्वे ट्रॅकजवळ बनावट नंबर प्लेटची स्कॉर्पिओ आणि ३० लाखांचे तांब्याचे साहित्य जप्त**बेळगाव उत्तरमध्ये रस्ते विकासकामांना सुरुवात; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ!*काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन!बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य पथसंचलन; ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत!वैशाली सुतार यांची राष्ट्रीय पातळीवर झेप! भरण्णा उप्पार यांच्याकडून विशेष सन्मानकाळ्या दिनाच्या फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होणार; महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार!*जैन कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय ICCMN-2026 परिषदेला प्रारंभ; विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधनाकडे वळावे!*प्रा. के. डी. मंत्रेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली; डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात कार्यक्रम