LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

बेळगावात RE-NEET UG परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था;

बेळगाव : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) वतीने घेण्यात येणाऱ्या ‘री-नीट यूजी’ (RE-NEET UG) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
२१ जून २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणाऱ्या परीक्षेदरम्यान शहरातील २८ परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत.
बेळगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. परीक्षेची प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळता यावा, हा यामागील उद्देश आहे.
आदेशानुसार परीक्षा केंद्रांच्या आसपास पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर हद्दीत ध्वनिक्षेपक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
परीक्षेच्या वेळेत परिसरातील सायबर कॅफे, इंटरनेट सेंटर आणि झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा कर्मचारी, अधिकारी आणि अधिकृत व्यक्तींव्यतिरिक्त इतर नागरिकांना केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
शहरातील संगोळ्ळी रायण्णा कॉलेज, केएलई संस्थेची विविध महाविद्यालये, शासकीय तंत्रनिकेतन, व्हीटीयू मच्छे येथील चार परीक्षा ब्लॉक, आरपीडी कॉलेज, ज्योती कॉलेज तसेच केंद्रीय विद्यालय क्रमांक १, २ आणि ३ यांसह अनेक परीक्षा केंद्रांचा यात समावेश आहे.
याशिवाय परीक्षा केंद्र परिसरात शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड किंवा कोणतेही आक्षेपार्ह साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*