Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*ताराराणी हायस्कूल, खानापूर दहावीचा निकाल 98.51% विद्यार्थिनींचे दैदिप्यमान यश*

खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी हायस्कूल, खानापूरने शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या एसएसएलसी (इयत्ता दहावी) परीक्षेत 98.51% असा भक्कम निकाल नोंदवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यंदा एसएसएलसी परीक्षेसाठी शाळेतील एकूण 202 विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी तब्बल 199 विद्यार्थिनी उत्तीर्ण होत शाळेचा निकाल 98.51% इतका उंचावला आहे.

विशेष श्रेणी - 42 प्रथम श्रेणी -112 द्वितीय श्रेणी- 26 तृतीय श्रेणी -19

मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींनी यश मिळवत शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. या भव्य यशामागे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू मॅडम यांचे दूरदर्शी नेतृत्व व प्रेरणा लाभली. तसेच संस्थेचे संचालक श्री शिवाजीराव पाटील सर व श्री परशराम गुरव सर सातत्यपूर्ण प्रोत्साहन, शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल जाधव सर यांचे सक्षम नियोजन आणि सर्व शिक्षकवृंद यांचे निष्ठापूर्ण मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थिनींची चिकाटी, जिद्द आणि पालकांचा भक्कम पाठिबा यामुळेच हा उल्लेखनीय निकाल शक्य झाला आहे.

या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*