LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*बेळगावात वक्तृत्वकलेवर KLS IMER चा विशेष मास्टर क्लास*


बेळगाव :
व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात प्रभावी संवाद कौशल्याचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन KLS Institute of Management Education & Research आणि Samvad Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने “इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग” या विषयावर पाच दिवसीय मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले होते. 11 ते 15 मे 2026 दरम्यान दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हा उपक्रम उत्साहात पार पडला.

व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असलेल्या KLS IMER कडून विद्यार्थ्यांसह समाजात नेतृत्व आणि संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. त्याच धर्तीवर आयोजित या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाला उद्योग, शैक्षणिक क्षेत्र, व्यावसायिक तसेच महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 36 सहभागी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

आजच्या स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने विचार मांडण्याची क्षमता ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. अनेक व्यक्तींमध्ये गुणवत्ता असूनही स्टेज फिअरमुळे त्यांना स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडता येत नाहीत. याच पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणामध्ये स्टेजवरील भीती दूर करणे, आवाजातील चढ-उतार, बॉडी लँग्वेज, कार्यालयीन बैठका व सादरीकरणांमधील प्रभावी संवाद, सामाजिक व औपचारिक कार्यक्रमांमधील बोलण्याची शैली तसेच प्रभावी ‘एलिव्हेटर पिच’ तयार करण्याचे तंत्र यावर विशेष भर देण्यात आला.

या मास्टर क्लासला कम्युनिकेशन कोच आणि प्रशिक्षक Vinod Deshpande यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक आणि प्रात्यक्षिक पद्धतीमुळे सहभागींचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.

समारोप कार्यक्रमाला Dilip Chitnis प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी Dr. Arif Sheikh होते. सहभागी विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी प्रशिक्षणातील अनुभव मांडत नव्याने आत्मसात केलेल्या वक्तृत्वकौशल्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागीांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाला Hyloc Group, Belgaum Ferrocast, Shanti Foumac, Belgaum Oxygen आणि Bhartesh Education Trust यांचे सहकार्य लाभले.
संवादकौशल्य हे केवळ व्यावसायिक यशासाठी नव्हे, तर नेतृत्वगुण विकसित करण्यासाठीही अत्यावश्यक असल्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*