LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*पुत्राचा अभियांत्रिकी शिक्षणात यश — वडिलांकडून भावनिक शुभेच्छा संदेश*

पुत्राचा अभियांत्रिकी शिक्षणात यश — वडिलांकडून भावनिक शुभेच्छा संदेश; “शिक्षण हे आयुष्याचा खरा पाया,” भावनिक आवाहन

बेंगळुरू : एम. एस. रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. S. Ramaiah Institute of Technology) या देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिक अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला, त्याच्या वडिलांकडून पदवीदान दिनी एक हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश देण्यात आला.

दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या Graduation Day निमित्त वडिलांनी व्यक्त केलेल्या भावना केवळ आपल्या मुलासाठीच नव्हे, तर सर्व पालकांसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यांनी म्हटले —
“तू अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून माझे स्वप्न साकार केलेस. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. तुझ्या मेहनतीमुळे कुटुंबाचं मस्तक उंचावलं आहे.”

यासोबतच, त्यांच्या मुलाची लोधा डेव्हलपर्स, बेंगळुरू या प्रतिष्ठित कंपनीत Graduate Engineer म्हणून झालेली निवड ही आणखी एक मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या संदेशात त्यांनी पुढे लिहिले —
“खरा यशाचा अर्थ फक्त पदवी किंवा पद नसून जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि समर्पण यात आहे. आपल्या कुटुंब, बहिण आणि कंपनीबद्दल निष्ठावान राहा. ह्याच मूल्यांमुळे तुझे जीवन अर्थपूर्ण बनेल.”

शेवटी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांचा उल्लेख करत म्हटले —

“मनाची जोपासना हीच मानवी जीवनाची सर्वोच्च साधना असावी.”

“सतत शिकत राहा, वाढत राहा आणि आपल्या मुळांचा विसर पडू देऊ नको,” अशा शब्दांत वडिलांनी आपल्या मुलाला आशीर्वाद दिला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*