LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात*

बेळगावातील कॅम्प परिसरातील ज्योती सेंट्रल स्कूल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवकालीन इतिहास जिवंत केला.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि देशभक्तीचा माहोल निर्माण झाला.

शिक्षिका अक्षता मोरे यांनी सादर केलेल्या प्रार्थनागीताने कार्यक्रमाला भक्तीभावाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी मावळे आणि शिवरायांच्या वेशभूषेत आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. शिक्षिका संजना कट्टी यांनी शिवरायांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टीची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

शिवरायांच्या जन्मसोहळ्याचे प्रतीकात्मक ‘पाळणा’ सादरीकरण, स्फूर्तिदायक पोवाडा, पराक्रमावर आधारित नृत्यनाट्य आणि समूहगायन यामुळे वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी आपल्या भाषणात शिवरायांचे विचार आणि आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षिका आरती चिंगळी यांनी केले. शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*