LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News | Politics News

*मराठीचे शिलेदार मायमराठीसाठी एकत्रितपणे लढणार*


महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्यच्या मीरारोड येथील मध्यवर्ती कार्यालयात अध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली.

गेल्या १०-१२ वर्षांपासून महाराष्ट्रात मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती सातत्याने संघर्ष करत आहे. तसेच बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी मराठी बांधवांचा ७० वर्षांहून अधिक काळ लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी अस्मितेच्या प्रश्नाला संपूर्ण महाराष्ट्राचे बळ मिळावे, यासाठी राज्यभर व्यापक जनजागृती करून नव्या लोकचळवळीची उभारणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी संयुक्तपणे संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.

मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर जनजागृती, संघटनबांधणी आणि लोकसहभागातून मराठी एकीकरणाचा व्यापक लोकलढा उभा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

एकच ध्यास — मराठीचा सन्मान, सीमाभागाचा न्याय आणि अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान!

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष**गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात RAF चे पथसंचलन; सुरक्षा व्यवस्था कडक**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचा ३० जणांचा चमू सज्ज! यश ॲटो येथे शुभेच्छा कार्यक्रम; रायगड व राजगड टीम २१ सप्टेंबरला रवाना**यल्लम्मा देवीच्या डोंगरावर दुकानांवर धाडी; औषधांची विक्री आणि निकृष्ट खाद्यपदार्थ उघड**सारथी नगर, पोलीस कॉलनीत ₹1.25 कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात; लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांना यश**शाहूनगरात विघ्नहर्ताच्या महाआरतीचा सोहळा; संदेश राजमाने यांचा मंडळाकडून सन्मान*देवस्थान संस्कृतीने जगाला आकर्षित केलेले भव्य राष्ट्र भारत : मनोहरजी मठदकर्नाटकातील विद्यार्थ्यांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू