कंग्राळी खुर्द - या गावचे सुपूत्र कै आ. बी आय पाटील यांना विविध उपक्रम राबवून 6 व्या स्मृतिदिनी श्रद्धांजली वाहण्यात आली .
बाल हनुमान तालीम मंडळ व परीवाराच्या वतिने आयोजित कार्यक्रमांत प्रथम गावच्या हुतात्मा चौकात कै आ .बी आय पाटील यांच्या तैलचित्राला अग्नीशमन दलाचे आधिकारी वेंकटेश टक्केकर व ॲड . सतिश बांदिवडेकर यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर पौर्णिमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महात्मा फुले कार्यालयात प्रारंभी उपस्थित शेकडो नागरिकांनी एक मिनीट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली .
त्यानंतर विविध मंडळाचे पदाधिकारी ॲड एम जी पाटील ,भाऊ पाटील , यल्लापा पाटील , कल्लापा पाटील , सोमनाथ पाटील , प्रविण खांडेकर , संतोष बोभाटे , बाळाराम पाटील , मनोहर पाटील , भैय्या पाटील महादेव पाटील , राजू प्रधान , अर्जून अलगोंडी, एम एन पाटील , अरुण कोलकार यांचेसह अन्य शेकडो नागरिकांनी कै आ. पाटील यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली . तर श्रीफळ यल्लापा पाटील यांनी वाढवले .यावेळी वरील मान्यवरांसह जे.आर पाटील व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शाब्दिक श्रद्धांजली वाहिली .
त्यानंतर पाटील परिवाराच्या वतीने जिल्हा स्तरिय व दसरा स्पर्धेत विविध वजनी गटात सुवर्ण रौप्य व कास्य पदके मिळवलेल्या 12 मुले व मुली पैलवांनाना रोख रक्कम व पुष्प देऊन गौरविण्यात आले .
तसेच प्राथमिक शाळेतील 20 पेक्षा जास्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच गावातील ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षा , सीईटी , जेजीई याच बरोबर संदर्भग्रंथ व धार्मिक आणि बोध प्रधान गोष्टीची जवळपास दहा हजाराची पुस्तके भेट देण्यात आली . तसेच शासकीय कोट्यातून एमबीबीएस ला निवड झालेल्या कु . समीक्षा संजय मोहनगेकर व कु स्नेहा यल्लापा पावशे तसेच इस्पायर अवार्ड दिल्ली येथील प्रदर्शनांसठी निवड झालेल्या अथर्व राजू चव्हाण यांचा शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला . तसेच प्रत्येक वर्षी असे उपक्रम राबवून सहकार्य केले जाईल असे आश्वासन पौर्णिमा पाटील यांनी यावेळी सांगिलते .
कार्यक्रमासाठी वरील मान्यवरांसह आर आय पाटील , केंपान्ना सनदी, राकेश पाटील,प्रेमा पाटील शिवाजी मुतगेकर , सरस्वती पाटील , रोहित पाटील , बाल हनुमान तालीम मंडळ , मसणाई युवक मंडळ , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , नव जागृती सेवा संघ कार्यकर्ते , पाटील परीवारातील सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक किसन पाटील यांनी तर सूत्रसंचालन टी.डी पाटील यांनी केले .

