Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतनमध्ये पालकांची कार्यशाळा संपन्न*

 दिनांक 18 जून 2026 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेत इयत्ता पहिलीच्या पालकांची कार्यशाळा  संपन्न झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील यांनी केले. तर पालकसभेत मराठी विषय दीप्ती कुलकर्णी, गणित विषय जयश्री पाटील, परिसर कमल हलगेकर, कन्नड सविता गुरव, इंग्रजी रोहिणी सावंत यांनी विषयवार मांडणी केली. शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले यांनी शाळेचे नियम, मेंदूचा विकास याबद्दल पालकांना माहिती दिली. पहिलीच्या वर्गातील सर्व विषयांच्या कृतीची वर्गमांडणी करण्यात आली. वर्ग मांडणी निरीक्षणातून कृती घेण्यात आली. चित्रकला, हस्तकला, संगीत, खेळ या सर्व विषयांतून कार्यशाळा भरवण्यात आली. मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

 कार्यशाळा  यशस्वी करण्यासाठी शाळेचे  प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील,शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, माध्यमिक मुख्याध्यापक नारायण उडकेकर, संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, पहिली वर्गाचे सर्व विषय शिक्षक, तेजश्री हंडे, यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कमल हलगेकर तर आभार प्रदर्शन जयश्री पाटील यांनी मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगावात श्री स्वामी समर्थ भक्तांचा भक्तिरंग; लाख नामस्मरणाने दुमदुमले गुजरात भवन*मराठी विद्यानिकेतनमध्ये पालकांची कार्यशाळा संपन्न*मध्यरात्री रंगला येळ्ळूर रोडवर फादर्स डेचा उत्सव; मुलांनी दिला वडिलांना प्रेमाचा अनोखा सन्मान*विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा 30 जुन पासून**बेळगावच्या पंडित नेहरू महाविद्यालयात उत्साहात पार पडली निबंध स्पर्धा; २०० विद्यार्थ्यांचा सहभाग**सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघना विरुद्ध दाखल करणार रिट याचिका**हत्तरगी टोलनाक्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीला रोखले; अमित शाह भेटीपूर्वी महामार्गावर ठिय्या आंदोलन**शुभम शेळके यांच्या विरोधातील नोटीशीला न्यायालयात आव्हान**चिकोडीच्या गुरुवार पेठेत भीषण आग; जयश्री गार्मेंट्स दुकान जळून खाक, लाखोंचे नुकसान**बेळगावात CCB पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या अफू तस्करीचा पर्दाफाश, एकाला अटक*