LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये चित्रकला, हस्तकला व संगणक प्रकल्प प्रदर्शन*

मराठी विद्यानिकेतनमध्ये चित्रकला, हस्तकला व संगणक प्रकल्प प्रदर्शन

दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये चित्रकला, हस्तकला व संगणक प्रकल्प प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्घाटक शौरीका गरगट्टी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संगणक विभाग प्रमुख श्रुती बेळगावकर यांनी केला. तर पाहुण्यांचे स्वागत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी केले . मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपण आपला निर्णय पक्का ठरवावा. कोणी विचारलं म्हणून आपला निर्णय बदलू नये, स्वतःला वेळ द्यावा, स्वतःवर प्रेम करावं, स्वतःचं कौतुक करावं, आपल्या छंदाला वेळ द्या असे मनोगत प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.कला ही मुलांच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारी असते. हस्तकला ,कल्पकता आणि कौशल्य यांचा मिलाफ आहे. अशाच नाविन्यातून शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, विविध चित्रे आणि संगणकावरील प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याचवेळी प्रदर्शन व विक्रीही चालू आहे. कलाशिक्षिका लता नगरे, अमृत गवस, संगणक शिक्षिका पद्मजा कुऱ्याळकर, अंजली बाबू गावडे, श्रुती बेळगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, सदस्य किरण पाटील,शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका नम्रता पाटील तर आभार विद्यार्थिनी कलाश्री बागेवाडी हिने केले. दिनांक 10फेब्रुवारी व 11 फेब्रुवारी रोजी हे प्रदर्शन खुले असेल.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*