Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*

बेळगाव :
बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि ICMR-NITM येथील सेक्शन ऑफिसर सौ. कावेरी मोहन कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण समन्वयक सविता पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर कावेरी कुंभार यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या — “विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करते, समस्या सोडवण्याची वृत्ती बळकट करते आणि समाजातील बदलासाठी प्रेरक ठरते. स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशी करा — हाच खरी प्रगतीचा मार्ग आहे.”

या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
मानवी शरीर, कचऱ्याची विल्हेवाट, पर्यावरण प्रदूषण, वाहतूक व्यवस्था, सेंद्रीय शेती, आरोग्य आणि स्मार्ट सिटी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग व मॉडेल्स सादर केले.

डी.एस. मुतगेकर, प्रसाद सावंत, रुपाली हळदणकर आणि स्नेहल पोटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभाग प्रमुख नारायण उडकेकर, प्राथमिक विभाग प्रमुख बी.जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, विज्ञान शिक्षिका मंजुषा पाटील, श्वेता सुर्वेकर, स्नेहा कुप्पेकर, तसेच संपूर्ण शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेळगावकर यांनी केले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*