Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*

मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून इंग्रजी शिक्षिका रोहिणी सावंत या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.सर सी .व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी 'विज्ञान गीत 'सादर केले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी संगीत साथ दिली. विद्यार्थी हर्ष गावडू पाटील याने विज्ञान शपथ घेतली.

सर सी. व्ही. रामन हे भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रकाशाच्या वक्रीभवनाच्यासंबंधी संशोधन केले. या संशोधनाला 'रामन प्रभाव' या नावाने ओळखले जाते.यांना १९३० साली जगातील सर्वोत्तम असे नोबेल पारितोषिक मिळाले. निसर्गावर व विशेषतः फुलांवर त्यांचे खूप प्रेम होते व त्यांचा समग्र दृष्टिकोनच वैज्ञानिक होता. अशा शब्दात शिक्षिका रोहिणी सावंत यांनी संकलित केलेली माहिती मुलांपर्यंत देण्यात आली.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक बी.एम्.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानावर आधारित भित्तीपत्रके बनवली तसेच विज्ञान विषयातील आकृत्यांवर रांगोळी स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत घेण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. विज्ञान विषय शिक्षक मंजुषा पाटील,रूपाली हळदणकर,स्नेहल बेळगावकर, नम्रता पाटील, शैला पाटील, शामला चलवेटकर, प्रसाद सावंत, स्नेहल पोटे, धीरजसिंह राजपूत, अटल विभाग प्रमुख श्वेता सुर्वेकर व विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांनी मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
महिला PSIच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; हिंडलगा कारागृहाची बदनामी केल्याचा आरोपअगसगा गावात आयुष्मान आरोग्य केंद्राचे भूमिपूजन; ५५ लाखांच्या कामाला सुरुवात*बेळगाव महापालिकेची नवी सुविधा; झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी अत्याधुनिक यंत्राची खरेदी**वडगावात शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक; बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीवर ठोस निर्णयाची तयारी**बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात**श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न**दिल्लीमध्ये आमदार अभय पाटील यांच्या कारला भीषण अपघात; इनोव्हा-स्विफ्टची धडक, सर्वजण सुखरूप**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.