LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*येळ्ळूर येथील मराठी मॉडेल शाळेला कर्नाटक पब्लिक शाळेचा (KPS) दर्जा प्राप्त*


           येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेला कर्नाटक सरकार कडून कर्नाटक पब्लिक स्कूलचा दर्जा देण्यात आला आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटक पब्लिक स्कूलचा शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष एस.डी.एम.सी .विद्यमान अध्यक्षा सौ. दिव्या संदीप कुंडेकर होत्या त्याच बरोबर शाळेचे माजी एसडीएमसी अध्यक्ष डी. जी. पाटील, माजी अध्यक्ष उत्तम खेमणाकर, माजी अध्यक्षा रूपा  धामणेकर , शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटी चे सेक्रेटरी आनंद पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.

          त्याचबरोबर शाळेत प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर मधून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना फुले तसेच रंगीत खडू चा बॉक्स देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.  शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले.

 हा प्रारंभोत्सव विद्यार्थ्यांच्याकडून केक कापून साजरा करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी व समाजसेवक राजेंद्र ओमाना धामणेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना  वह्यांचे वाटप केले.  एलकेजी पासून बारावी पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली तसेच मोफत मिळणार आहे . द्विभाषा शिक्षण या शाळेत सुरू होत असल्याने यावर्षी मोठ्या संख्येने एलकेजी युकेजी तसेच पहिली वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी  प्रवेश घेतला. याप्रसंगी शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटी सेक्रेटरी आनंद पाटील, माजी एस.डी.एम.सी. अध्यक्ष डी जी  पाटील, माजी अध्यक्ष उत्तम खेमणाकर , एस.डी.एम.सी.विद्यमान उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेला मिळालेल्या दर्जाबद्दल आनंद व्यक्त केला व शिक्षकांचे अभिनंदन केले. यानंतर अध्यक्ष भाषण शाळेच्या

एस.डी.एम.सी.अध्यक्षा सौ.दिव्या संदीप कुंडेकर यांनी केले या कार्यक्रमाला शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटी चे सदस्य शंकर टक्केकर, माजी एस.डी.एम.सी. उपाध्यक्षा मनीषा घाडी, शाळेच्या माजी उपाध्यक्षा नेत्रप्रभा पाटील, एसडीएमसी विद्यमान सदस्य मुर्तीकुमार माने,जोतिबा  पाटील, शशिकांत पाटील, चांगदेव मुरकुटे, दिनेश लोहार, विजय धामणेकर, मारुती यळगुकर, सदस्या अलका कुंडेकर, राजश्री सुतार, शुभांगी मुतगेकर, प्रियांका सांबरेकर, रेश्मा काकतकर, ज्योती पाटील,  अर्चना देसाई तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक आर. एम. चलवादी, सूत्रसंचालन ए. वाय. मेणसे, स्वागत मेघा देसाई आणि आभार एस बी पाखरे यांनी मांडले.या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*