Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राज्यस्तरीय NSS परिषदेत मराठा मंडळ पॉलिटेक्निकची चमक*

बेळगाव : मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात (MMEC) नुकत्याच 29 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय NSS परिषदेत मराठा मंडळ पॉलिटेक्निकने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. पॉलिटेक्निकच्या दीपिका सूर्यवंशी (CS – 3rd sem) आणि संस्कृती सावलगी (EC – 1st sem) यांना त्यांच्या प्रभावी व उत्कृष्ट सादरीकरणासाठी ‘बेस्ट प्रेझेंटेशन’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

समारोप कार्यक्रमादरम्यान पुरस्कार व प्रमाणपत्रे MMEC चे प्राचार्य डॉ. प्रवीण चिट्टी यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विजयानिमित्त पॉलिटेक्निकचे प्राचार्य R. S. सूर्यवंशी, उपप्राचार्य A. P. तोरवी, CS विभागप्रमुख R. N. मोटार, E&C विभागप्रमुख M. N. जावळकर, तसेच NSS समन्वयक G. K. शिवयोगीमठ यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

विद्यार्थिनींच्या या कामगिरीमुळे मराठा मंडळ पॉलिटेक्निकने राज्यस्तरीय NSS उपक्रमात पुन्हा एकदा आपली शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*