LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*बेळगाव तालुक्यातील खादरवाडी मराठी शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार*

बेळगाव तालुक्यातील खादरवाडी मराठी शाळेने ‘आदर्श शाळा’ पुरस्कार पटकावून शैक्षणिक क्षेत्रात नवा मान मिळवला आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त शाळेच्या वतीने विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत, ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या शाळेचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक दळवी यांनी उपस्थित सर्व नेते व मान्यवरांचा परिचय करून दिला. या गौरव सोहळ्यास खादरवाडी मराठी शाळेचे शिक्षणप्रेमी व प्रसिद्ध उद्योजक रमेश पाटील, मनूर ग्रामपंचायत सदस्य साबरेकर, एसडीएमसी अध्यक्ष परसराम गोरल तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश माळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय उत्तम पाटील, भारत बस्टवाडकर, देवाप्पा कोलेकर, राजू डोळकर, परशुराम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेने मिळवलेल्या या सन्मानामुळे संपूर्ण खादरवाडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बागेवाडी सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या यशामध्ये शिक्षकांचे समर्पण आणि पालकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*