LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

मण्णूर : मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने कलमेश्वर हायस्कूल, मण्णूर चा दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भरत चौगुले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत सोसायटीच्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर कलमेश्वर हायस्कूलमधील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. कामिनी सोमनाथ कदम (88.8%) यांना 1000 रुपये व स्मृतिचिन्ह द्वितीय क्रमांकाच्या कु.संपूर्णा लक्ष्मण काकतकर (83.2%) यांना 700 रुपये व स्मृतिचिन्ह. तृतीय क्रमांकाच्या कु. सर्वस्वी बाळू काकतकर (81.7%) यांना 500 रुपये तसेच स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन श्री. आर. एम. चौगुले यांनी शुभेच्छापर भाषण करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मातोश्री सोसायटीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला व आर्थिक व्यवहारांची माहितीही उपस्थितांना दिली.
यावेळी उपाध्यक्ष सागर कटगेन्नावर, संचालक नारायण नाईक, शंकर सांबरेकर, सोमनाथ कांबळे, तसेच सल्लागार नारायण कालकुंद्री, नागेश चौगुले, नितीन कदम, मलाप्पा चौगुले संदीप

डोनकर महेश चौगुले पालक सोमनाथ कदम सौ माधुरी कदम. सौ रेखा लक्ष्मन कातकर,सौ शोभा बाळू काकतकर उपस्थित होते
कार्यक्रमास कलमेश्वर हायस्कूल सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांचे आभार भरमा चौगुले यांनी केले

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*