Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*ज्ञानसागर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान; चिन्मयी उप्पार ठरली अव्वल*

बेळगाव येथील ज्ञानसागर स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात चिन्मयी केंपन्ना उप्पार हिला ‘पर्ल ऑफ ज्ञानसागर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच सृष्टी संतोष हलकर्णी हिने ‘रायजिंग स्टार अवॉर्ड’ पटकावला, तर प्रत्यक्ष आनंद घिवारी याला ‘विद्यार्थी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात समर्थनगर प्रभागाच्या नगरसेविका नेत्रा भागवत, निवृत्त आर्मी पोलीस परशराम बेकवाडकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष कणेरी, मराठी युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव तसेच पत्रकार रवींद्र जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विविध विभागांतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. नर्सरी विभागात सृष्टी हलकर्णी, शौर्य शेठ, सुकृती कंग्राळकर, सानवी उप्पार आणि स्वराज्य जालगार यांनी 100 टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले. एलकेजी विभागात प्रत्यक्ष आनंद घिवारी प्रथम, तर अरुंधती कम्मार द्वितीय ठरली.

युकेजी विभागात चिन्मयी उप्पार हिने 100 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रमिता बुल्ली (99.08 टक्के) द्वितीय, दिव्यांश प्रजापती तृतीय आणि आरोही बांडगी चतुर्थ क्रमांकावर राहिले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर चिन्मयी उप्पार हिने आपल्या भावना व्यक्त करत शाळा व शिक्षकांचे आभार मानले. नगरसेविका नेत्रा भागवत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिक्षिका सुधा मुचंडी, स्वाती कंग्राळकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*