LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये ‘इग्नाइट 2026’ प्रोजेक्ट एक्स्पो उत्साहात संपन्न*

बेळगाव : Maratha Mandal Polytechnic येथे ISTE स्टुडंट्स चॅप्टरतर्फे आंतरविभागीय ‘Ignite 2026’ प्रोजेक्ट एक्स्पोचे आयोजन 21 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य श्री. रविकुमार एस. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ISTE स्टुडंट्स चॅप्टरच्या अध्यक्षा सौ. एस. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

महाविद्यालयातील सर्व विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध तांत्रिक संकल्पना, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि उद्योगाभिमुख मॉडेल्स यांचे सादरीकरण करण्यात आले. ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख श्री. पांडुरंग पिंगट, सिव्हिल विभागाच्या प्रमुख सौ. सी. एस. देशपांडे, ई&सी विभागाचे प्रमुख श्री. महेश जावळकर, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख श्री. संजीव सोंनद, संगणक विज्ञान विभागाचे प्रमुख श्री. रविंद्र मोटार, ई&ई विभागाच्या प्रमुख सौ. पाकिजा जुनेदी तसेच इनोव्हेशन कौन्सिलच्या अध्यक्षा सौ. गौरी उप्पिन यांनी विद्यार्थ्यांना नवकल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या प्रोजेक्ट एक्स्पोला Maratha Mandal Central High School, Jijamata High School तसेच Maratha Mandal High School Cavata Galli येथील विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यांनी विविध विभागांचे प्रकल्प पाहून समाधान व्यक्त केले.

यावेळी प्राचार्य श्री. रविकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डिप्लोमा शिक्षणाचे महत्त्व, त्याचे करिअरमधील फायदे आणि तांत्रिक शिक्षणाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ISTE टीम, सर्व विभागप्रमुख, इनोव्हेशन कौन्सिल सदस्य, तसेच अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अल्पावधीत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*